काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर G 23 गट पुन्हा सक्रिय ! | पुढारी

काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर G 23 गट पुन्हा सक्रिय !

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : पाच राज्यातील झालेल्या निवडणुकांमध्ये नामुष्कीजनक हार काँग्रेसला पत्करावी लागली. यानंतर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये सोनिया गांधी यांनी पाच राज्यातील प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. दरम्यान काँग्रेसमधील G-२३ म्हणजे नाराज असलेले नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. G-२३ नेत्यांनी आज गुलाब नबी आझाद यांच्या घरी बैठक झाली. (congress dissident leaders)

या बैठकीला कपिल सिब्बल, शशी थरूर, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुडा, राजिंदर कौर भट्टल, अखिलेश प्रताप सिंह, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, मणिशंकर अय्यर, कुलदीप शर्मा आणि राज बब्बर या नेत्यांचा समावेश होता. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तरांखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील निकालाच्या दिवशीही यातील G-23 नेत्यांची बैठक झाली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल सिब्बल यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु त्यांनी गांधी कुटुंबावर खुल्याने विरोधात बोलल्याने त्यांच्यावर काही नेते नाराज झाल्याने या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले.

congress dissident leaders :  सिबल यांची गांधी घराण्यावर थेट टीका

कपिल सिबल यांनी गांधी घराण्यावर आणि कार्यकारणीवर थेट टीका केल्याने त्यांच्यावर काही नेते नाराज आहेत. सिबल यांनी गांधी घराण्यातील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून वेगळे होऊन दुसऱ्याला संधी द्यावी, अशी वेळ आल्याचे वारंवार बोलुन दाखवले होते.

इंडियन एक्स्प्रेस दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, आम्हाला ‘घरातील काँग्रेस’ नको, तर सबकी काँग्रेस पाहिजे आहे. पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीने बैठक घेतल्यानंतर सिबल यांनी असे वक्तव्य केले होते.

दरम्यान काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून आणि त्यांना संघटनात्मक बदल करण्याची परवानगी देऊन CWC बैठक संपवली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हणाले की, CWC बैठकीला संबोधित करताना सोनियांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या राजीनाम्याची ऑफर दिली होती, परंतु काँग्रेस नेत्यांनी एकमताने ते नाकारले.

निवडणुकीतील सलग पराभवानंतर, G-२३ किंवा २३ असंतुष्ट नेत्यांच्या गटाने सोनिया गांधींना पत्र लिहून संघटनात्मक बदलासाठी आवाज उठवला. या नेत्यांनी पक्षात पूर्णवेळ आणि नेतृत्व आणि सामूहिक निर्णय घेण्याची मागणी लावून धरली होती.

Back to top button