भगवंत मान यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट | पुढारी

भगवंत मान यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली आहे. भगवंत मान १६ मार्चला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मोहालीमध्ये शुक्रवारी झालेल्या आम आदमी पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी भगवंत मान यांची निवड करण्यात आली.

पंजाबमध्ये आप ने सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रीमंडळात कोणाला स्थान असेल? यावर चर्चा रंगली आहे. मंत्रीपदासाठी हरपालसिंह चीमा, अमन अरोडा, बलजिंदर कौर, जीवनज्योत कौर आणि डॉ. चरणजीत सिंह इत्यादी नावे चर्चेत आहेत. भगवंत मान यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. भगवंत मान हे शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव खटकड कला य़ेथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

रविवारी मान आणि अरविंद केजरीवाल सुवर्ण मंदीर, दुर्गियाणा मंदीर आणि श्रीराम तीर्थ मंदीरात दर्शनासाठी जाणार आहेत. तर पंजाबमध्ये मिळवलेला विजयानंतर मतदारांना धन्यवाद देण्यासाठी अमृतसर मध्ये रोड शो देखील केला जाणार आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये ११७ विधानसभेच्या जागांपैकी ९२ जागा जिंकल्या आहेत.

हेही वाचलतं का?

पाहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

Back to top button