UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये ८०-२० चे राजकारण यशस्वी : ओवेसी

UP Election Result : उत्तर प्रदेशमध्ये ८०-२० चे राजकारण यशस्वी : ओवेसी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( UP Election Result ) भारतीय जनता पक्षा विजयावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे विधान आता समोर आले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी यूपीच्या निवडणूक निकालांबाबत सांगितले की, येथे ८०-२० राजकारण यशस्वी झाले आहे.

ओवेसी म्हणाले, 'राजकीय ( UP Election Result ) पक्ष आपले अपयश लपवण्यासाठी ईव्हीएमची ओरड करत आहेत. मी २०१९ पासून म्हणत आलो आहे, की ही ईव्हीएमची चूक नाही तर लोकांच्या मनात एक चिप टाकण्यात आली आहे, ही त्यांची चूक आहे. यश मिळाले पण हे यश ८०-२० यश आहे.

ओवेसी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांचा केवळ व्होट बँक म्हणून वापर करण्यात आला आहे. लखीमपूर खेरीमध्येही भाजपचा विजय झाला, म्हणून मी म्हणतोय ८०-२० असा विजय आहे. ही ८०-२० स्थिती वर्षानुवर्षे राहील. लोकांना हे समजून घेणे आवश्यक आहे. ( UP Election Result )

त्याचवेळी यूपीमधील ( UP Election Result ) आपल्याच पक्षाच्या कामगिरीवर ओवेसी म्हणाले की, यूपीच्या जनतेने भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मी जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्या AIMIM चे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि लोकांचे मी आभार मानतो. आमचे प्रयत्न भरीव होते, पण परिणाम आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. आम्ही पुन्हा मेहनत करू.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला जनतेने नाकारले आहे. आतापर्यंतच्या निकालात एमआयएमचे बहुतांश उमेदवार पाच हजार मतांचा आकडाही पार करू शकलेले नाहीत. उत्तर प्रदेश निवडणुकीत एमआयएमने जवळपास १०० उमेदवार उभे केले होते. पक्षाने दावा केला होता की त्यांचे २५ – ३० उमेदवार विजयी होऊ शकतात. पण ते दावे पोकळ निघाले आणि पक्षाचा अनेक उमेदवारांचे डिपॉझिट देखिल जप्त झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news