AAP sweeps Punjab : पंजाबमध्‍ये आपच्‍या ‘झाडू’ने ‘या’ दिग्‍गजांना चारली धूळ | पुढारी

AAP sweeps Punjab : पंजाबमध्‍ये आपच्‍या 'झाडू'ने 'या' दिग्‍गजांना चारली धूळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक यश मिळवलं आहे. ( AAP sweeps Punjab ) आमच्‍या वादळात काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्‍या दिग्‍गज नेत्‍यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्‍ये पंजाबचे मुख्‍यमंत्री चरणचीत सिंह चन्‍नी, उपमुख्‍यमंत्री ओपी सोनी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नवज्‍योत सिंग सिद्धू, शिरोमणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल, माजी मुख्‍यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा समावेश आहे. जाणून घेवूया,पंजाबमधील दिग्‍गजांच्‍या पराभवाविषयी सविस्‍तरपणे…

AAP sweeps Punjab :  मोबाईल दुरुस्‍ती करणार्‍याने केला मुख्‍यमंत्री चन्‍नींचा पराभव

चरणजीत चन्‍नी : पंजाबचे मुख्‍यमंत्री चरणजीत चन्‍नी हे भदौड आणि चमकौर साहिब या दोन मतदारसंघातून नशीब आजमवले होते. चन्‍नी यांना चमकौर साहिब मतदारसंघात आपच्‍या चरणजीत यांनी पराभूत केले. दर भदौडमध्‍ये लब सिंह हे विजय झाले. भदौडमध्‍ये विजयी झालेले लब सिंह हे सर्वसामान्‍य कुटुंबातील आहेत. त्‍याचे मोबाईल दुरुस्‍ती करण्‍याचे दुकानामध्‍ये काम करत होते.

नवज्‍योत सिंग सिद्धू : अमृतसर पूर्व या मतदारसंघतून काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नवज्‍योत सिंग सिद्धू यांचा पराभव झाला. येथे आम आदमी पार्टीच्‍या जीवन ज्‍योत कौर यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला.

ओपी सोनी : ओपी सोनी से पंजाबचे उपमुख्‍यमंत्री होते. त्‍यांनी अमृतसर मध्‍य मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्‍यांचा आम आदमी पाटीच्‍या अजय गुप्‍ता यांनी पराभव केला.

अमरिंदर सिंग : पटियालामधून माजी मुख्‍यंमत्री कॅप्‍टन अमरिंदर सिंग रिंगणात होते. त्‍यांचा आम आदमी पार्टीचे अजित सिंग कोहली यांनी पराभव केला.

सुखबीर सिंग बादल : शिरोमणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल हे जलालाबादमधून निवडणूक लढवली. येथे आपचे जगदीप कंबोज यांचा विजय झाला.

प्रकाश सिंग बादल : शिरोमणी अकाली दलाचे दिग्‍गज नेते आणि माजी मुख्‍यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा पराभव झाला. येथे आपचे गुरमीत सिंह खुदियान यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

बिकम सिंग मजीठिया : शिरोमणि अकाली दलाचे नेते आणि नवज्‍योत सिंग सिद्धू यांचे प्रमुख विरोधी बिक्रम सिंग मजीठिया हेही अमृतसर पूर्वमधून निवडणूक पराभूत झाले आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

Back to top button