Uttar pradesh result : उत्तर प्रदेशात भाजपची जोरदार मुसंडी | पुढारी

Uttar pradesh result : उत्तर प्रदेशात भाजपची जोरदार मुसंडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सत्ता कोणाची येणार हे ठरवणाऱ्या उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणूक मतमोजणी होत आहे. आज (ता. १०) सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने उत्तर प्रदेशात १६५ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष ८५ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाचे करहालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत. (Uttar pradesh result)

निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण तयारी केली आहे. राज्याच्या गादीवर कोण बसणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संधी मिळणार की सपा अखिलेश यादव इतिहास रचणार याचे उत्तरही आजच मिळणार आहे.

एनडीटीव्हीच्या पोल ऑफ एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष 232 जागा जिंकू शकतात. काँग्रेसला 4 आणि बसपाला 17 जागा मिळतील, तर समाजवादी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना 150 जागा मिळू शकतात.

उत्तर प्रदेशात 7 टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये 2 टप्प्यांत, तर उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत एका टप्प्यात अलीकडेच मतदान पार पडले होते. पाचही राज्यांचा निवडणूक निकाल (Election Result 2022) गुरुवारी जाहीर होणार आहे.

मतदानोत्तर चाचण्यांचा विचार केला तर उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांत भाजपला सरकार बनविण्याची संधी मिळण्याची शक्यता असून, गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसदरम्यान काट्याची टक्‍कर आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button