मधुमेहग्रस्तांमधील बीटी पेशी सुधारण्यासाठी 'बीजीआर-३४' प्रभावी ! संशोधकांचा दावा | पुढारी

मधुमेहग्रस्तांमधील बीटी पेशी सुधारण्यासाठी 'बीजीआर-३४' प्रभावी ! संशोधकांचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) विकसित केलेले ‘बीजीआर-३४’ हे औषध मधुमेहग्रस्तांसाठी वरदान ठरत आहे. असा दावा संशोधनाअंती करण्यात आला आहे. विविध टप्प्यात करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षानंतर मधुमेहग्रस्तांमधील शर्कराची पातळी कमी केली असून अग्नाशयातील बीटा पेशींच्या कार्यप्रणालीत बीजीआर-३४ सुधारणा करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पंजाब मधील चितकारा विद्यापीठातील कॉलेज ऑफ फार्मसीचे रविंद्र सिंह यांच्या नेतृत्वात एका गटाने मधुमेहग्रस्त १०० रुग्णांवर चार टप्प्यांमध्ये चाचणी केली होती. ‘सर्बियन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल अँड क्लिनिक रिसर्च’ मध्ये प्रकाशित या शोध अध्ययनानूसार रूग्णांच्या दोन समुहावर हे ‘डबल ब्लाइंड ट्रायल’ करण्यात आले. एका समुहाला ‘सीटाग्लिप्टिन’ तर दुसरा समुहाला ‘बीजीआर-३४’ देण्यात आले.

संशोधनाअंती मधुमेहग्रस्तांवर ‘बीजीआर-३४’ औषध प्रभावकारक असल्याचे दिसून आले. पहिल्या निष्कर्षात ‘ग्लाइकेटेड हिमोग्लोबिन’ च्या (HBA1C) मध्ये घट दिसून आली. शिवाय रँडम शुगर तपासणीतही ‘बीजीआर-३४’ चा प्रभाव दिसून आले.

CSIR च्या लखनऊ येथील दोन प्रयोगशाळा ‘सीमॅप’ तसेच ‘एनबीआरआय’ ने बीजीआर-३४ विकसित केल्यानंतर एमिल फार्मास्युटिकलने हे औषध बाजारात आणले. मधुमेहग्रस्तांमधील शर्कराचे प्रमाण कमी करीत इन्सुलिन उत्पन्न करणाऱ्या बीटा पेशींच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे महत्वाचे कार्य बीजीआर-३४ करीत असून हे औषध अँटीऑक्सीडेंट गुणांनी युक्त असल्याची माहिती एमिल फार्मास्युटिकल चे कार्यकारी संचालक डॉ. संचित शर्मा यांनी दिली.

अत्यल्प संशोधानामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदीक औषधांचा मर्यादीत वापर केला जातो. पंरतु, या नवीन संशोधनामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या कसोटीवर आयुर्वेदीक फार्मूला ‘एलोपॅथी’ पेक्षाही सरस ठरत असल्याचे बोलले जात आहे. एलोपॅथी औषध ‘सीटाग्लिप्टिन आणि आयुर्वेदीक औषध ‘बीजीआर-३४’ मधुमेहावर प्रभावी असल्याचा दावा त्यामुळे या संशोधनानंतर केला जात आहे.

हे ही वाचा  

Back to top button