Nawab Malik Arrest : मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ उपोषण | पुढारी

Nawab Malik Arrest : मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ उपोषण

मुंबई, पुढारी वृत्तसेवा  : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Arrest ) यांना कोर्टाने ३ मार्च पर्यंत कोठडी सुनवाली असल्याने, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र पवित्रा घेतला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रसरकारच्या विरोधात आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे.

मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयाकडून तब्‍बल ८ आठ तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोर्टात हजर केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने ३ मार्च पर्यंत कोठडी सुनवाली. ईडी आणि केंद्रसरकारच्या या कृतीचा महाविकास आघाडीने  निषेध करत, उपोषणाला सुरूवात केली.

या उपोषणाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते बसले आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button