देशातील १५ ते १८ वयोगटातील २ कोटी मुलांचे संपूर्ण लसीकरण !

देशातील १५ ते १८ वयोगटातील २ कोटी मुलांचे संपूर्ण लसीकरण !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील कोरोना लसीकरण अभियानाने वेग देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांमध्येच तब्बल दोन कोटी मुलांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी दिली.

तर, आतापर्यंत या वयोगटातील ५ कोटी ३१ लाख ९४ हजार ५०७ मुलांना पहिला डोस लावण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला या वयोगटातील १२ लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. लसीकरणासाठी अजूनही कोव्हिन अँपवर नोंदणी केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता गेल्या महिन्यापासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात करण्यात आली होती.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत १ कोटी ८४ लाख ९० हजार १५२ बूस्टर डोस लावण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ३९ लाख ९८ हजार ८८१ आरोग्य कर्मचार्यांना, ५७ लाख ३५ हजार ३४६ फ्रंटलाईन वर्कर्स आणि ८७ लाख ५५ हजार ९२५ जेष्ठ नागरिकांना आतापर्यंत बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news