पुढारी ऑनलाईन डेस्क
Gold Prices Today : सोन्याचा दर पुन्हा एकदा ५० हजारांवर गेला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine crisis updates) पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारात आज बुधवारी शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,०७६ रुपयांवर होता. तर चांदीचा प्रति किलो दर ६४ हजारांवर आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Prices Today २४ कॅरेट सोने ५०,०७६ रुपये, २३ कॅरेट सोने ४९,८७५ रुपये, २२ कॅरेट सोने ४५,८७० रुपये, १८ कॅरेट सोने ३७,५५७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,२९४ रुपये होता. चांदीचा प्रति किलो दर ६४,१३८ रुपये होता. काल मंगळवारी शुद्ध सोन्याचा दर ५०,१३१ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. (हे दुपारी १२ नंतरचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)
दरम्यान, मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५०,१८८ रुपये होता. चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. चांदी प्रति किलो ६४ हजारांवर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,८९८ डॉलरवर आहे. ((१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम) युक्रेन आणि रशिया यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिका आणि कॅनडाने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावलेले आहेत. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रशियाविरुद्ध अनेक आर्थिक प्रतिबंध लावले असल्याचे जाहीर केले होते. रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे, असा आरोपही अमेरिकेने केलेला आहे. या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
रशियाने पूर्व युक्रेनच्या दोन प्रांतात सैन्य पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर सेफ हेवन गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी वाढली आहे. यामुळे सोन्याचे दर वाढू लागले असल्याचे सराफा बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :