

नोएडा ; पुढारी ऑनलाईन डेस्क
मानवातही अनेक अवगुण असतात आणि ते वेळोवेळी बाहेर येत असतात. नोएडा येथे एका हत्येमागील उघड झालेले रहस्य याला पुष्टी देते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी २२ वर्षीय महिलेची हत्या तर केलीच, शिवाय तिच्या मृतदेहासोबत सेक्सही केला. आश्चर्य म्हणजे या व्यक्तीने महिलेच्या पतीकडून दीड लाख रुपयेही घेतले. आरोपी (28 वर्षीय) ऑटो चालक आहे.
सुपारी देऊन केली पत्नीची हत्या…
दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामबीर उर्फ साहू हा मृत महिलेच्या पतीचा मित्र आहे. पत्नीला मारण्यासाठी त्याने मित्राला दीड लाख रुपयांची सुपारी दिली आणि काम झाल्यावर पोलिसांत तक्रारही केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या पतीने 20 जानेवारीला संध्याकाळी पोलिसांना सांगितले की, तो घरी परतला तेव्हा त्याला पत्नीचा मृतदेह आढळला. या माहितीवरून सेक्टर 126 पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सगळा प्रकार सांगितला…
नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, रामबीरला सेक्टर 94 गोल चक्कर जवळ अटक करण्यात आली. 'चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, 19 जानेवारीला त्याच्या मित्राने पत्नीला मारण्यासाठी त्याला 70 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 20 जानेवारी रोजी महिलेचा पती त्याला महामाया उड्डाणपुलाजवळ भेटला आणि नंतर पत्नीला मारण्याचा आग्रह धरला. पण, रामबीरने नकार दिला. त्यानंतर त्यांने 70 हजारांची ऑफर दीड लाख रुपयांपर्यंत वाढवली. या लोभापायी रामबीर अडकला.
रामबीर घरी आला. त्याने महिलेला सांगितले की, तिच्या पतीने पैसे पाठवले आहेत. त्यानंतर महिलेने दरवाजा उघडला असता, रामबीरने तिला धक्काबुक्की करून तिच्या डोक्यात वार केला. महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने वारंवार फरशीवर डोके आपटून तिचा जीवे मारले. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात मृतदेहासोबत सेक्सही केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालानंतर आरोपीची चौकशी केली असता, त्याने हत्येनंतर मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे कबूल केले. आरोपींविरुद्ध खुनासोबतच बलात्कार आणि गुन्हेगारी कटाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणीसोबत लग्नाच्या भानगडीत पत्नीची हत्या…
पोलिसांनी सांगितले की, रामबीरच्या जबानीच्या आधारे मृत पत्नीच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. तो महामाया उड्डाणपूलाजवळ कचोरी विकत होता. त्याचा जीव मेव्हणीवर जडला. तीच्यासोबत लग्न करण्यासाठी पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने हे षडयंत्र रचले.