हिजाब विरूद् भगवा स्कार्फ : कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कपड्यांवर कर्नाटक सरकारची बंदी

हिजाब विरूद् भगवा स्कार्फ : कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कपड्यांवर कर्नाटक सरकारची बंदी
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुली परिधान करत असणाऱ्या हिजाबवर कर्नाटक सरकारने नुकताच बंदीचा फतवा काढला आहे. या बंदीवरून कर्नाटकमध्ये वाद सुरू झाला असून, आता हिंदू मुलींनी भगवा स्कार्फ परिधान करून जय श्रीरामच्या घोषणा देत रॅली काढली. या पार्श्वभुमीवर कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कपड्यांवर बंदी घातलीय.

याबबात काढलेल्या सरकारी आदेशात, कर्नाटक शिक्षण कायदा, 1983 चे कलम 133(2) लागू केले गेले आहे. ज्यामध्ये एकसमान शैलीचा पोशाख अनिवार्यपणे परिधान करणे आवश्यक आहे. तसेच खासगी शाळा प्रशासन त्यांच्या आवडीचा ड्रेस निवडू शकतात.

त्याचबरोबर या कायद्यानुसार महाविद्यालय विकास समिती किंवा महाविद्यालयांच्या प्रशासकीय मंडळाच्या अपील समितीने ठरवून दिलेला पोशाख विद्यार्थ्यांना परिधान करावा लागेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. जर या समितीने ड्रेसची निवड केली नाही तर समानता, अखंडता आणि कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही असे कपडे घालू नयेत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. तथापि, काही शैक्षणिक संस्थांमध्ये मुले आणि मुली त्यांच्या धर्मानुसार वागू लागल्याचे शिक्षण विभागाने निदर्शनास आणून दिल्याने, समानता आणि एकतेवर परिणाम होत आहे. आदेशातील पेहरावाच्या बाजूने. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि विविध उच्च न्यायालयांचाही उल्लेख करण्यात आला.

हिजाब बंदीनंतर राज्यातील अनेक महाविद्यालयांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना वर्गात जाऊ दिले जात नसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तर हिंदू विद्यार्थी हिजाबला प्रतिसाद म्हणून भगवी शाल घालून शैक्षणिक संस्थांमध्ये येत आहेत.

दरम्यान, हिजाब विरूद्ध भगवा स्कार्फ वादाने राजकीय रंग घेतला आहे. एकीकडे राज्यातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने शिक्षण व्यवस्थेचे 'तालिबानीकरण' होऊ देणार नसल्याचे म्हंटले आहे. तर दुसरीकडे विरोधी काँग्रेस पक्षाने मुस्लीम मुलींच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी, आरएसएस आणि भाजपने हिजाब च्या नावावर राज्यात सांप्रदायिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे लोकांना भडकावत असल्याप्रकरणी अटक करावी अशी विनंती केली.

हिजाबच्या नावाखाली मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा संघ परिवाराचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला. एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ असे बोलतात. त्यांना या घटनेची माहिती नाही का? असा सवालही उपस्थित केला. अशा प्रकारच्या मुद्यावरून मुलींना शिक्षणापासून वंचीत ठेवणे म्हणजे त्यांच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले. दुसरीकडे भाजपचे नेत्यांनी राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेचे 'तालिबानीकरण' होऊ देणार नाही. असे म्हंटले आहे.

हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिक्षण मंत्री अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत उच्च न्यायालय या संदर्भात आदेश देत नाही तोपर्यंत राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांना विद्यमान ड्रेस नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

शैक्षणिक संस्थेतील हिजाबवर बंदी घालण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात शिकणाऱ्या पाच मुलींनी दाखल केलेल्या याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयात ८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news