Punjab Congress : ‘काँग्रेस मुख्यमंत्री उमदेवार चन्नी की सिद्धू? याचा फैसला जनतेनेच करावा’
चंदीगड : पुढारी ऑनलाईन
पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असतानाच काँग्रेसमधील ( Punjab Congress )मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? हा प्रश्न कायम राहिला आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील नागरिकांनीच फैसला करावा, असे आवाहन काँग्रेस हायकंमाड यांनी केले आहे. आता इंटरेक्टिव्ह व्हायस रिस्पॉन्स (आयव्हीआर) प्रणालीव्दारे दूरध्वनीवरुन याचा निर्णय होणार आहे.
Punjab Congress : पहिला पर्याय चन्नी यांच्या नावाचा!
काँग्रेस 'आयव्हीआर' प्रणालीमध्ये तीन पर्याय देण्यात येतील. यामध्ये पहिला पर्याय हा विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाचा असेल. दुसरा पर्याय हा नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाचा असेल. तिसरा पर्याय हा मुख्यमंत्री उमेदवाराशिवायच काँग्रेसने निवडणुकीला सामोर जावे, असा असेल. यामध्ये पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड आणि सुखजिंदर रांधवा यांच्या नावाचा समावेश नाही, असे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी आम आदमी पार्टीने आयव्हीआर प्रणालीव्दारे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा, याचा काैल जाणून घेण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यावर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आक्षेप घेतला होता. अशा प्रकारे
प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याचे त्यांनी म्हटलं होते. यानंतर आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. आता काँग्रेस पक्षाकडूनच हा प्रयोग होत आहे.
अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला होता मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. चन्नी यांनी अल्पावधीत लोकप्रिय मुख्यमंत्री अशी आपली ओळख निर्माण केली आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. तर सिद्धू यांची लोकप्रियता आणि विकासाचे मॉडल हे पंजाबच्या विकासा पूरक ठरेल, असा विश्वास सिद्धू समर्थक व्यक्त करत आहेत.
हेही वाचलं का?