गेवराई : चंदन साठ्यावर राजपिंप्री येथे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा | पुढारी

गेवराई : चंदन साठ्यावर राजपिंप्री येथे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

गेवराई (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा :  गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील शेतात चंदन तस्करी करून त्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यांमार्फत आज मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईत एक पुष्पासह पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच, गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथे शेतातील चंदनाची झाडे तोडून त्याच्या चोरट्या मार्गाने वाहतूक करून लाखों रुपये कमावणारा पुष्पा अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. देवपिंप्री शेतात हा सर्व मुदेमाल साठवण्यात येत होता आणि त्यानंतर त्याची स्कार्पिओ गाडीतून तस्करी केली जात होती. त्यामुळे ही गाडीही देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

तसेच, अंदाजे 50 किलो चंदन नावाची लाकडे जप्त करण्यात आले असून याप्रकरणी एका ‘पुष्पा’सह त्याचे पाच साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक आर राजा स्वामी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जोंधळे पोलीस हे. खेडकर पोलीस नाईक दुबाले, बागवान पवार, शिंदे यांनी केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचलं का  

Back to top button