भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस | पुढारी

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ चा अर्थसंकल्प (union budget 2022) भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. 

अर्थसंकल्प 2022 : आयटी, एनर्जी, बॅटरी, खासगी बँक, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक क्षेत्राला बुस्टर डोस

सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी या ट्विटमध्ये  #AatmaNirbharBharatKaBudget (आत्मनिर्भर भारत का बजेट) हा हॅशटॅग वापरला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विटवर संमिश्र कमेंट्स येत आहेत. मध्यमवर्गीय करदात्याच्या तोंडाला पानं पुसल्याबद्दल सरकारचं हार्दिक अभिनंदन. नोकरदार करदात्यांना कोणतीही सूट नाही आणि साडेचार कोटी ‘अल्पसंख्य’ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची खिरापत. मज्जा आहे ना!! अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

union budget 2022 – सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार्‍या पहिल्या महिला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा दहावा र्थसंकल्प तर अर्थमंत्री म्हणून सलग चौथा अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन  सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार्‍या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.  

 

हेही वाचलतं का ? 

Back to top button