

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौच्या सरोजिनीनगरच्या बिजनौर भागात प्रेयसीला भेटायला गेलेला तरुण खोल विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. बिजनौर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्या तरुणाला बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनलालगंज परिसरात राहणाऱ्या तरुणाचे सरोजिनीनगरमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
दोघेही सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास बिजनौर परिसरातील माटी गावाजवळ पोहोचले होते. यावेळी दाट धुक्यामुळे हा तरुण खोल विहिरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी त्याची मैत्रीणही विहिरीजवळ होती. तो तरुण विहिरीत पडल्यानंतर ती तिथेच थांबून ओरडू लागली. आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या ग्रामस्थांनी ४० फूट खोल विहिरीत एक तरुण असल्याचे पाहिले.
तो तरुणही मदतीसाठी ओरडत होता. गावकऱ्यांनी बिजनौर पोलिसांना माहिती दिली. बिजनौरचे प्रभारी निरीक्षक राजकुमार घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांच्या मदतीने सुटका करून दोरीच्या सहाय्याने तरुणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीत पडल्यामुळे तरुण जखमी झाला आहे.
पोलिसांनी त्यांना सरोजिनीनगर सीएचसीमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून घरी सोडले. प्रभारी निरीक्षक बिजनोर राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. दोघेही गावात भेटायला आले होते. त्यावेळी तो तरुण विहिरीत पडला.
हेही वाचलत का?