देशात कोरोनाचा वेग मंदावतोय! २ लाख ५१ हजार नवे रुग्ण, ६२७ जणांचा मृत्यू | पुढारी

देशात कोरोनाचा वेग मंदावतोय! २ लाख ५१ हजार नवे रुग्ण, ६२७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ५१ हजार २०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. दरम्यान, दिवसभरात ३ लाख ४७ हजार ४४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २१ लाख ५ हजार ६११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट १५.८८ टक्के आहे.

याधीच्या दिवशी कोरोनाचे २ लाख ८६ हजार ३८४ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ५७३ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. दिवसभरात ३ लाख ६ हजार ३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.

केरळमध्ये पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण ९४ टक्के

केरळमध्ये कोरोनाचे जे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवले होते ते बहुतांश ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यात डेल्टाचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी दिली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्याची गरज असते. कोरोनाच्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे तर डेल्टाचे प्रमाण ६ टक्के आहे. याचाच अर्थ असा की केरळमध्ये तिसरी लाट ही ओमायक्रॉनची आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

देशातील ११ राज्‍यांत कोरोनाच्या ५० हजार पेक्षा जास्‍त रूग्‍णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, केरळमधील तीन लाखांहून अधिक रूग्‍ण आहेत. २६ जानेवारी पर्यंत १४१ जिल्ह्यांत ५ ते १० टक्‍के संक्रमण कमी झाले आहे, असे आरोग्‍य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद : बारा वर्षांच्‍या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू?

मागील काही दिवस औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. काल गुरुवारी एका बारा वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्‍यान,  या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आला होता. तिच्‍या मेंदूत इन्फेक्शन होते. त्यामुळे तिचा मृत्यू कोरोनामुळेच झाला, असे म्हणता येणार नाही, असे महापालिकेच्‍या आराेग्‍य अधिकार्‍यांनी म्‍हटले आहे.

Back to top button