आरोग्‍य मंत्रालय : 'देशात ओमायक्रॉन संक्रमणा बरोबर डेल्टाचा उद्रेक सुरूच' | पुढारी

आरोग्‍य मंत्रालय : 'देशात ओमायक्रॉन संक्रमणा बरोबर डेल्टाचा उद्रेक सुरूच'

नवी दिल्‍ली, पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे रूग्‍ण हे ओमायक्रॉन प्रकारातील आहेत. आणि त्‍याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. आरोग्‍य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यावर म्‍हणाले की, देशात गेल्‍या एक महिन्यांमध्ये जे रूग्‍ण सापडले आहेत,  त्‍यामध्ये ओमायक्रॉन रूग्‍णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच डेल्‍टा व्हेरिएंटचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होत आहे.

जगामध्ये 6.5 कोटी ॲक्‍टिव्ह रूग्‍ण आहेत. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका या देशात कोरोना रूग्‍ण संख्या कमी होत आहे. भारतात 22 लाख ॲक्‍टिव्ह रूग्‍ण आहेत. यामध्ये 50 हजार पेक्षा जास्‍त रूग्‍ण हे 11 राज्‍यात आहेत. तर 10 ते 50 हजार ॲक्‍टिव रूग्‍ण 14 राज्‍यात , तर 10 हजार पेक्षा कमी रूग्‍ण हे 11 राज्‍यात आहेत. देशात 400 जिल्‍ह्यात सकारात्मक रेट हा 10 टक्क्यांपेक्षा जास्‍त आहे. कर्नाटक, केरळ, तमिलनाडु, गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान या राज्‍यात पॉझिटिव्हीटी रेट सर्वात जास्‍त आहे.

नागरिकांनी कोरोना लसीकरणासोबत सूचनांचे पालन करावे : अब्दुल सत्तार

तसेच, देशातील 11 राज्‍यात कोरोनाचे 50 हजार पेक्षा जास्‍त रूग्‍णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, केरळमधील तीन लाखांहून अधिक रूग्‍ण आहेत. 26 जानेवारी पर्यंत 141 जिल्‍हात 5 ते 10 टक्‍के संक्रमण कमी झाले आहे. असे आरोग्‍य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, 15-18 वर्षे वयोगटातील 59 टक्‍के मुलांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. देशात 97.03 लाख आरोग्य कर्मचारी, फ्रटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना कोविड-19 लसीचा ‘बुस्‍टर’ डोस देण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ, तमिलनाडु, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान मध्ये कोविड-19 सर्वात जास्‍त रूग्‍ण आहेत तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल येथे  कोविड-19 संक्रमणाचा दर कमी झालेला  आहे.

Back to top button