एअर इंडिया : आज टाटा समुहाकडे 'एअर इंडिया' सोपवली जाणार | पुढारी

एअर इंडिया : आज टाटा समुहाकडे 'एअर इंडिया' सोपवली जाणार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : आज एअर इंडिया कंपनी टाटा समुहाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतल्यानंतर आज पुन्हा टाटा समुहाकडेच सोपवली जात आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लिलावाच्या प्रक्रियेनंतर ८ ऑक्टोबरला १८ हजार करोड रुपयांमध्ये एअर इंडिया ही टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी टाटा समुहाचीच उपकंपनी आहे.

अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, “सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एअर इंडियाला (Air India) गुरुवारी सोपविण्यात येणार आहे.” दरम्यान, दोन एअरलाईन पायलट युनियन, इंडियन पायलट गिल्ड आणि इंडियन कमर्शियल पायलट असोशिएशनने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचे कारण वैमानिकांच्या थकबाकीवर अनेक कपाती आणि वसुली असल्याचा अंदाज आहे.

शिवाय इतर दोन युनियनने उड्डाण होण्यापूर्वी विमानतळावर चालक दलाच्या सदस्यांचे बाॅडी मास इंडेक्स मोजण्यासंदर्भात कंपन्यांनी २० जानेवारीला जो आदेश दिला होता, त्याचा विरोध केला आहे. इअर इंडिया कर्मचारी संघ आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने सोमवारी विक्रम देव दत्त यांना पत्र लिहून या आदेशाचा विरोध करत कंपनीचा हा आदेश अमानवीय आहे. त्याचबरोबर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयच्या नियमांचं उल्लंघन करणारे आहे, असे नमूद केले आहे.

पहा व्हिडिओ : सर कटा सकते हैं लेकिन! देशसेवेसाठी हात, पाय गमावलेल्या सैनिकांचा थक्क करणारा पराक्रम

हे वाचलंत का? 

Back to top button