leopard : वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादीसह पिल्लू कैद   | पुढारी

leopard : वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादीसह पिल्लू कैद  

महाळुगे पडवळ (पुणे); पुढारी वृतसेवा : लौकी-चांडोली रोडवर (ता. आंबेगाव) येथील राणूबाई मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि. 26) सकाळी बिबट्याच्या (leopard) मादीचे सुमारे पाच महिने वयाचे पिल्लू कैद झाले तर सायंकाळी ७ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाचे वनपाल नारायण आरोडे यांनी दिली.

मंगळवारी (दि. २५) वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. गेल्या १५ दिवसात लौकी येथील दोन तरुणांवर बिबट्याच्या मादीने (leopard) जीवघेणा हल्ला केला होता. बिबट्याची मादी सैरभैर होउन नागरिकांवर हल्ले करीत आहे. वनविभागाने पिंजरे लावावे, यासाठी लौकी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संदेश थोरात, सरपंच एकता थोरात व उपसरपंच मंगल थोरात यांच्यासह अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पिंजरा लावल्यानंतर मादी आणि पिलू कैद झाले.

Back to top button