IAS केडर सुधारणेवरून मोदी सरकार आणि राज्य सरकारांमधील वाद शिगेला ; काय आहे प्रकरण ? | पुढारी

IAS केडर सुधारणेवरून मोदी सरकार आणि राज्य सरकारांमधील वाद शिगेला ; काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारकडून आयएएस केडरच्या (IAS cadre) नियमांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. अनेक राज्‍य सरकारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. यामध्ये बहुतांश बिगर-भाजप शासित राज्ये आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्‍यानंतर आठवडाभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दोनदा पत्र लिहिले. तसेच महाराष्ट्र, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आक्षेप घेतला. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विरोध केला आहे.

सुहास एलवाय : देशाला पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे पहिलेच IAS अधिकारी

काय आहे आयएएस केडर (IAS cadre) नियम

 • 12 जानेवारी रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले की, केंद्र सरकार IAS (Cadre) नियम, 1954 मध्ये सुधारणा करू इच्छित आहे. यावर केंद्राने राज्यांना 25 जानेवारीपर्यंत मत देण्यास सांगितले आहे.
  आतापर्यंत राज्यांचे आयएएस अधिकारी केंद्राकडे प्रतिनियुक्तीची इच्छा व्यक्त करायचे अशी व्यवस्था होती. यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकार्‍यांची यादी बनवायचे आणि त्यानंतर त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवले जायचे.
 • 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकार ही दुरुस्ती मांडू शकते, असे मानले जात आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत, देशात एकूण 5,200 IAS अधिकारी होते, त्यापैकी 458 केंद्रात होते.
 • मात्र केंद्र सरकारचा आयएएस केडरच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय अनेक राज्यांतील अधिकाऱ्यांना पसंत पडत नसल्याने या नियमांमध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी आता अनेक राज्यांकडून केली जात आहे.
 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून यावर पुनर्विचार न केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
 • जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हे संघराज्य रचनेच्या विरोधात आहे.
  प्रतिनियुक्तीवरून केंद्र आणि राज्यांमध्ये यापूर्वीही संघर्ष झाला आहे. मे 2021 मध्ये, केंद्र आणि पश्चिम बंगालमध्ये IAS अलपान बंदोपाध्याय यांच्यात संघर्ष झाला होता.
 • डिसेंबर 2020 मध्ये, बंगाल सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रात पाठवण्यास सहमती दर्शवली नाही.
  त्याचवेळी, 2001 मध्ये अटल सरकारचा तामिळनाडूच्या जयललिता सरकारसोबत आयपीएस अधिकाऱ्यांबाबत वाद झाला होता.

हेही वाचलं का

Back to top button