INSACOG : देशात ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर ! मोदी सरकारनेच दिली स्पष्ट कबुली | पुढारी

INSACOG : देशात ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर ! मोदी सरकारनेच दिली स्पष्ट कबुली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट समूह संसर्गाच्या टप्प्यावर असून अनेक मेट्रो शहरांमध्ये प्रबळ विळखा घातला असल्याचे समोर आले आहे. INSACOG ने आपल्या ताज्या बुलेटीनमध्ये याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. अनेक शहरांमध्ये बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण ही सर्व व्हेरिएंटिवरोधात ढाल असल्याचेही बुलेटिनमध्ये म्हटले आहे. INSACOG केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणात काम करते.

INSACOG नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करून अहवाल देण्याचे काम करते. तसेच काही राज्यात जिल्हानिहाय तपशील सादर करतात. आतापर्यंत त्यांच्याकडून १ लाख ५० हजार ७१० नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे, तर १ लाख २७ हजार ६९७ नमुन्यांचे पृथ्थकरण करण्यात आले आहे.

दुसरीकडे ओमायक्रॉनच्या वंशावळीत आणखी एका व्हेरियंटची निर्मिती झाली झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. या नव्या व्हेरियंटचे नाव ओमायक्रॉन BA.2 असे आहे. या व्हेरिएंट फ्रान्स, डेन्मार्क, भारतासह ४० देशांमध्ये पोहोचला आहे. या व्हेरियंटमध्ये व्यक्तींना अतिवेगाने संक्रमित करण्याची क्षमता आहे.

INSACOG चे ताजे बुलेटिन आज (ता.२३) प्रकाशित झाले आहे. या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या आतापर्यंतच्या केसेस लक्षणे नसलेली किंवा सौम्य स्वरुपाची दिसून आली आहेत. रुग्णालयामध्ये दाखल होणे आणि आयसीयूमध्ये दाखल होण्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

बुलेटिनमध्ये आणखी माहिती देताना म्हटले आहे की, देशात आता सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर आहे आणि अनेक मेट्रो शहरांमध्ये तो अधिक प्रबळ झाला आहे. अनेक शहरांमध्ये वेगाने केसेस वाढत आहेत. देशात नवा व्हेरिएंट BA.2 केसेस मोठ्या प्रमाणात आहेत. S जीन ड्रॉपआउट आधारित स्क्रीनिंगमुळे सर्वांधिक निगेटिव्ह मिळत आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या B.1.640.2 व्हेरिएंटचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या वेगवान प्रसार होण्याविषयी कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे तो चिंतेचा विषय नसल्याचे INSACOG ने म्हटले आहे. INSACOG ३ जानेवारीचे बुलेटिनही आज प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये ओमायक्रॉनचा देशात समूह संसर्ग सुरु झाल्याचे म्हटले आहे. दिल्ली आणि मुंबई तो अधिक शक्तीशाली झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पुढील ओमायक्रॉनचा देशातील परदेशातून आलेल्यांकडून न होता अंतर्गत फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे व्हायरसमध्ये होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलामुळे नमुने तपासण्याच्या प्रक्रियेत INSACOG कडून बदल करण्यात येत आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button