HLL Lifecare : मोदी सरकारने आता Moods कंडोम निर्मिती करणारी कंपनी विकायला काढली ! | पुढारी

HLL Lifecare : मोदी सरकारने आता Moods कंडोम निर्मिती करणारी कंपनी विकायला काढली !

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

Moods कंडोम निर्मिती करणाऱ्या एचएलएल लाइफकेअर लि.मधील (HLL Lifecare) आपली संपूर्ण मोदी सरकार विकणार आहे. या कंपनीच्या संभाव्य खरेदीदारांसाठी स्वारस्य पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत देखील वाढविण्यात आली आहे. सरकारने नवीन मुदत २८ फेब्रुवारी केली आहे. यापूर्वी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी होती. (HLL Lifecare)

DIPAM ने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणू महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन आणि इच्छुक बोलीदारांच्या विनंतीनुसार, स्वारस्य व्यक्त करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पात्र बोलीदारांना (QIBs) विभागाकडून कळवण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून १४ मार्च करण्यात आली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने १४ डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रातील केंद्रीय सार्वजनिक उपक्रम (CPSE) मधील सरकारच्या १०० टक्के स्टेक विक्रीसाठी प्राथमिक बोली आमंत्रित केल्या होत्या.

HLL Lifecare हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उपक्रम आहे. HLL Lifecare गर्भनिरोधक औषधे, महिलांची आरोग्यसेवा उत्पादने, रुग्णालयातील पुरवठा तसेच इतर फार्मास्युटिकल उत्पादनांच्या निर्मिती आणि विपणनामध्ये गुंतलेली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button