आधी शरीरसंबंधांसाठी धमकी, नंतर अंतर्वस्त्रे भेट म्हणून पाठवली ! संतापलेल्या शिक्षिकेने घरमालकाला.. | पुढारी

आधी शरीरसंबंधांसाठी धमकी, नंतर अंतर्वस्त्रे भेट म्हणून पाठवली ! संतापलेल्या शिक्षिकेने घरमालकाला..

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

भाडेकरू म्हणून आलेल्या महिला शिक्षिकेला अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटकमधील आहे. पीडित शिक्षिकेने राहत असलेल्या घरमालकावर अत्यंत गंभीर आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला आहे.

संबंधित शिक्षिकेनं घरमालकाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केल्याचा आरोप केला आहे. तसे न केल्यास घर खाली करण्यास धमकी दिल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे. त्या महिलेचे आरोप घरमालकाने फेटाळून लावले आहेत. आरोप निराधार असून महिला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलीसांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखून घरमालकाची चौकशी केली आहे.

पीडित महिला शिक्षिकेनं घरमालकाने वाढदिनी भेट म्हणून अंतर्वस्त्र दिल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही, तर ती भेट दिलेली अंतर्वस्त्र घालून दाखवावी अशी मागणी केल्याचेही तिने म्हटले आहे. सोबत फिरायला येण्यासाठीही बळजबरी केल्याचे महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. घरमालक ११ जानेवारीला गेटवरुन उडी मारुन घरी प्रवेश केल्याचेही म्हटले आहे. पीडित महिला श्रीनगरमधील असून दक्षिण बंगळूरमध्ये वास्तव्यास आहे. संबंधित महिला भाडेकरूच्या घरात गेल्या १२ वर्षांपासून राहत आहे.

दुसरीकडे घरमालकाने निर्दोष असल्याचा दावा करत घर खाली करण्यास सांगितल्याने आरोप केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे पोलीसांनी महिलेनं केलेल्या आरोपांवर चौकशी सुरु केली आहे. दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button