gold rate : सोन्याचे दर एका महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली जागतिक बाजारपेठेत gold rate वधारल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात gold rate ने उसळी घेतली आहे. एमसीएक्स वायदे बाजारात सोन्याचे एका तोळ्याचे अर्थात प्रति १० ग्रॅमचे दर एका महिन्याच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे दर मंगळवारी ४८ हजार २५८ रुपयांवर गेला आहे.
चांदीच्या दरात स्थिरता असून चांदीचे प्रति किलोचे दर ६७ हजार ४४२ रुपयांवर गेले आहेत.
अधिक वाचा :
- आषाढी एकादशी : मराठी कलाकारांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ नामाचा जयघोष
- पंढरपूर वारी : संत मुक्ताई पालखी सोहळा शिवशाही बसने पंढरपूरला रवाना
चादीच्या दरात स्थिरता
सोमवारी चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली होती. उच्चतम स्तरापासून सोन्याचे दर आठ हजार रुपयांनी खाली आहेत.
जगातील अनेक देशात कोरोनाचे रूग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत, त्यामुळे सोन्याला मागणी आल्याचे बाजार सूत्रांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा :
- आषाढी एकादशी : मराठी कलाकारांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ नामाचा जयघोष
- पेगासस प्रकरणी विरोधकांचा लोकसभेत गदारोळ; कामकाज तहकूब
जागतिक बाजारात सोन्याचे प्रति औंसचे दर १८१८ डॉलर्सवर गेले आहेत.
दुसरीकडे चांदीचे दर २५.१८ डॉलर्सवर स्थिर असून प्लॅटेनियमचे दर १०७८ डॉलर्सवर गेले आहेत.\
हे ही वाचा :
- फोन हॅकिंग प्रकरणी संसदेत गोंधळ; कामकाज दुपारपर्यंत स्थगित
- Pegasus : ‘हेरगिरीचा खर्च भागवण्यासाठी सरकार इंधन महाग करत आहे’
- ऑलिम्पिक : खेळाडू १२५, कोण बनेगा चॅम्पियन?
हे ही पाहा :