पंजाब निवडणूक : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, नवज्योत सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभुमीवर भाजप, काँग्रेस, सपा, आप, बसपा यासारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने आज पंजाब निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे चमकौर साहिबमधून तर नवज्योत सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत.
पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून, 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
पंजाब चुनावों के लिए कांग्रेस ने 86 सीटों पर उम्मीदवारों की सूची जारी की। मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिब SC से चुनाव लड़ेंगे, पंजाब कांग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्व से चुनाव लड़ेंगे। pic.twitter.com/Ggrxf0Ytl9
— ANI_HindiNews (@AHindinews) January 15, 2022
हेही वाचा