श्रीनगर : पुढारी ऑनलाईन
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील झालेल्या चकमकीत ( Kulgam encounter ) पाकिस्तानमधील दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलास यश आले. या धडक कारवाईत एक पोलिस जवान शहीद झाला. या चकमकीत भारतीय सैन्यदलाच्या तीन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत.
कुलगाम जिल्ह्यातील परीवान परिसरात दहतवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहिम राबवली. दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत ( Kulgam encounter ) दहशतवादी बाबर याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.
Kulgam encounter : पाकिस्तानी दहशतवाद्याचा चार वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये हाेता सहभाग
चकमकीत ठार झालेला दहशतवादी हा जैश -ए -मोहम्मद संघटनेचा आहे. तो पाकिस्तानचा नागरिक असून बाबर असे त्याचे नाव आहे. २०१८पासून शोपियान आणि कुलगामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये त्याच्या सहभागी होता. त्याच्याकडून एके -47 रायफल, एक पिस्तुल आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती काश्मीर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.
हेही वाचलं का?