सीएम योगी अयोध्या मतदारसंघातून शड्डू ठोकणार ? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत | पुढारी

सीएम योगी अयोध्या मतदारसंघातून शड्डू ठोकणार ? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत भाजप आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपावर विचार अगोदरपासून सुरू झाला आहे. मंगळवारी दिल्लीत कोर कमिटीची बैठक संपन्न झाली. यामध्ये आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार यावरही चर्चा करण्यात आली. पार्टीचे मत आहे की, योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राज्यात हिंदूत्वाचा संदेश जाईल. असं असलं तरी मुथरेतूनही योगींना लढविण्याच्या विचारात पार्टी आहे. मात्र, खासदार हरनाथ यादव यांनी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्र लिहून कळविले आहे की, योगींनी मथुरेतून लढविण्यात यावं.

ते पत्रात पुढे असं लिहितात की, श्री कृष्णाने माझ्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP)यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी. गोरखपूरमधून पाच वेळा खासदार असलेले योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा मोठा चेहरा मानला जातो. त्यांच्या येण्याने भाजपमध्ये बुस्ट मिळालेला आहे. पहिल्यापासून अयोध्या की मथुरा या मतदारसंघाची चर्चा योगी आदित्यनाथांवरून सुरू होती.

काशी, मथुरा आणि अयोध्या, या मतदारसंघांना घेऊन भाजप आधीच उत्साही आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत आहे. काशीमध्ये विश्वनाथ धाम काॅरिडोरची निर्मिती केली जात आहे. मथुरामध्ये युपी सरकराने अनेक योजना सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपने उत्तरप्रदेशमध्ये यंदा २७० आणि २९० आमदार निवडून येतील असा अंदाज बांधला आहे.

Back to top button