आलीशान SUV Audi Q7 Facelift साठी बुकिंग सुरू ; याच महिन्यात लॉन्च होणार ! | पुढारी

आलीशान SUV Audi Q7 Facelift साठी बुकिंग सुरू ; याच महिन्यात लॉन्च होणार !

पुढारी ऑनलाईन डेस्क

लक्झरी कार निर्माता ऑडीने आपल्या नवीन SUV Audi Q7 Facelift साठी बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने सांगितले की नवीन Audi Q7 फेसलिफ्ट ५ लाख रुपये टोकन रक्कम भरून बुक केली जाऊ शकते. SUV Audi Q7 Facelift या महिन्यात अधिकृतपणे लॉन्च केली जाईल. तथापि, कंपनीने अद्याप त्याची लॉन्च तारीख उघड केलेली नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरला भेट देऊन किंवा वेबसाइटद्वारे बुक करू शकता.

डी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले की, “वर्ष २०२१ मध्ये ९ प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर, आम्ही आणखी एक उत्कृष्ट उत्पादन लॉन्च करणार आहोत. नवीन वर्षात आम्ही याबद्दल खूप उत्सुक आहोत. यासाठी आम्ही बुकिंग सुरू केले आहे. ऑडी Q7 ही रस्त्यावरील मजबूत उपस्थिती आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ग्राहकांना नेहमीच आवडते. आता आम्ही ती आणखी फिचर्ससह लॉन्च करणार आहोत. खात्री आहे की ऑडी Q7 ला ग्राहकांचे प्रेम मिळेल.

Audi Q7 facelift to launch in India by early 2022 - Overdrive

अनेक उत्तम फीचर्स मिळणार

नवीन 2022 SUV Audi Q7 Facelift फेसलिफ्टमध्ये अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट यांसारखी फिचर्स मिळतील. यासोबतच ड्रायव्हरच्या सोयीसाठी अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत, ज्यात लेन डिपार्चर वॉर्निंगसह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि पार्क असिस्ट प्लस यांचा समावेश आहे.

Audi Q7 facelift: new cabin and mild-hybrid tech for seven-seat SUV | CAR Magazine

अशा प्रकारे, नवीन 2022 Audi Q7 फेसलिफ्टचा ड्रायव्हिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला असेल. फिचर्सच्या यादीमध्ये 4-झोन एअर कंडिशनिंग, 30-कलर कंटूर अॅम्बियंट लाइटिंग, एअर आयोनायझर आणि अॅरोमॅटायझेशन, बँग आणि ओलुफसेन 3D साउंड सिस्टम समाविष्ट आहे.

File:Audi Q7 (Facelift) rear 20110115.jpg - Wikimedia Commons

नवीन 2022 Audi Q7 फेसलिफ्ट SUV 3.0L V6 TFSI पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. डिझेल इंजिनचा पर्याय दिलेला नाही.

बाहेरील बदलांबद्दल बोलायचे झाल्यास, याला मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प आणि मागील एलईडी टेल लॅम्पसाठी नवीन डिझाइन मिळेल. अपडेटेड अलॉय व्हील्सचा सेटदेखील एसयूव्हीला अधिक चांगला बनवतो.

Audi Q7 45 TDI Quattro S Line facelift (2020) review

नवीन Audi Q7 फेसलिफ्ट प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल. ग्राहक www.audi.in वर ऑडी Q7 ऑनलाइन बुक करू शकतात किंवा जवळच्या ऑडी इंडिया डीलरकडेनोंदणी करू शकतात.

हे ही वाचलं का ?

Back to top button