साऊथ आफ्रिकेचा ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त | पुढारी

साऊथ आफ्रिकेचा ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

पुढारी ऑनलाईन: साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ख्रिस मॉरिसनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीय. ख्रिस मॉरिस देशांतर्गत संघ असरणाऱ्या टायटन्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही त्यानं सांगितलंय. ख्रिस मॉरिसनं अचानक तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

TATA in IPL : ‘टाटा’ची आयपीएलमध्ये धमाकेदार एन्ट्री, Vivo ची केली सुट्टी

ख्रिस मॉरिसनं आपल्या इंन्स्टाग्रामवरून एक पोस्ट केलीय. त्यात असं म्हटलंय की, “आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे! माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या लोकांचे मी त्यांचं आभार मानतो. मग तो व्यक्ती लहान किंवा मोठा असो. हा प्रवास खूप सुखदायक होता, असं ख्रिस मॉरिसनं म्हटलंय. तसेच दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट संघ टायटन्सनं त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानं त्यानं आनंद व्यक्त केलाय.

 Pramila Datar : गायिका प्रमिला दातार यांच्या घरी ३४ लाखांची चोरी

ख्रिस मॉरिसची कारकिर्द

34 वर्षीय असलेल्या ख्रिस मॉरिसनं आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. मॉरिसनं 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना 48 विकेट्स आणि 467 धावा आहेत. याबरोबरच आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये त्यानं 23 सामन्यात 34 विकेट्ससह 133 धावा केल्या आहेत.

Back to top button