आमदार मुख्तार अन्सारी: एक तरुण, जो ब्रजेश सिंग गॅंगला संपवून यूपीचा डॉन बनला | पुढारी

आमदार मुख्तार अन्सारी: एक तरुण, जो ब्रजेश सिंग गॅंगला संपवून यूपीचा डॉन बनला

पुढारी ऑनलाईन: या गोष्टीची सुरुवात होते ती 3 जून रोजी 1963 तारखेपासून. गाझीपूर जिल्ह्यातील युसूफनगरमध्ये सुभानुल्लाह अन्सारी आणि बेगम राबिया यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यात दादा मुख्तार अहमद अन्सारी काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे अध्यक्ष तसेच जामिया मिलिया इस्लामियाचे कुलपती होते. त्यांनी परदेशात शिक्षण घेतले होते. त्यांच्या डॉक्टरेट ऑफ मेडिसिन आणि डॉक्टरेट ऑफ सर्जरीसारख्या पदव्या भिंतीवर लावलेल्या होत्या. स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी होते आणि महात्मा गांधीही त्यांना भेटायला येत असत.

नातूही आजोबांप्रमाणे जगात नाव कमावेल, असे कदाचित घरच्यांना वाटले असावे. पण कोणास ठाऊक की हा मुलगा एके दिवशी पूर्वांचलमधील मोठा डॉन ब्रजेश सिंगला आव्हान देईल आणि नंतर त्याची जागा घेऊन तो उत्तर प्रदेशचा डॉन बनेल. आम्ही बोलतंय मऊचे 5 वेळा आमदार राहिलेले मुख्तार अन्सारी यांच्याबद्दल, ज्यांचे नाव आजही पूर्वांचलमधील लोकांना घाबरवण्यासाठी पुरेसे आहे.

1970 च्या दशकात देश झपाट्याने बदलत होता. नवीन कारखाने उभारले जात होते. नवीन महाविद्यालये बांधली जात होती. आणि मोठमोठी सरकारी कंत्राटे वाटली जात होती. मागासलेल्या पूर्वांचल प्रदेशाच्या विकासाला पंख देण्याच्या उद्देशाने यूपी सरकारने प्रकल्प मंजूर केले. पण या प्रकल्पांची कंत्राटे घेण्यासाठी राज्यात माफिया टोळ्या जन्म घेतील आणि यूपीची जमीन रक्ताने लाल होईल, हे कोणालाच वाटले नव्हते.

बीड जिल्ह्यात माफियाराज असल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?; पंकजा मुंडे यांचा उद्विग्न सवाल

मुख्तारला मखनू सिंगच्या टोळीद्वारे गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश करण्याची संधी मिळाली. 1980 मध्ये, या टोळीने साहिब सिंगच्या टोळीशी सैदपूर, गाजीपूर येथे जमिनीसाठी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर हिंसाचार आणि कत्तलीचा असा सिलसिला सुरु झाला. हे पाहून लोक हैराण झाले. साहिब सिंगच्या टोळीत वाराणसीचा एक तरुण होता, त्याचे नाव ब्रजेश सिंग होते. तोच ब्रजेश सिंग ज्याच्याबरोबर मुख्तार अन्सारीचा आकडा ३६ होता. 1990 मध्ये ब्रजेश सिंगने स्वतःची टोळी तयार केली आणि गाझीपूरचे सर्व कंत्राटी कामे आपल्या ताब्यात घेतली. कोळसा, रेल्वे बांधकाम, खाणकाम, दारू, सार्वजनिक बांधकाम अशा 100 कोटींच्या कंत्राटी कामावरून अन्सारी आणि ब्रजेश सिंग यांच्या टोळीमध्ये अनेकवेळा रक्तरंजित चकमकी झाला. या टोळ्या खंडणी रॅकेट, अपहरण आणि गुंडा टॅक्सही गोळा करत असत.

अन्सारीच्या नावाने लोक हादरायचे

90 च्या दशकापर्यंत मुख्तार अन्सारी हे पूर्वांचलमधील गुन्हेगारी जगतात मोठे नाव बनले होते. वाराणसी, गाझीपूर, जौनपूर आणि मऊमध्ये त्यांच्या नावाने लोक थरथर कापत होते. मुख्तार हे ब्रजेश सिंग यांच्याशी लढण्यासाठी राजकारणाकडे वळले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि 1996 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर विजयी होऊन ते आमदार झाले. यानंतर मुख्तार यांनी थेट ब्रजेश सिंह यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. या दरम्यान पूर्वांचलमधील या दोन मुख्य टोळ्या बनल्या होत्या.

2002 मध्ये ब्रजेश सिंहने अन्सारीच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि मुख्तारचे तीन साथीदार ठार झाले. या गोळीबारात ब्रजेश सिंगही गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं मान्यात येऊ लागले. यानंतर मुख्तार अन्सारी संपूर्ण पूर्वांचलमध्ये प्रसिद्ध होऊ लागला. परंतु काही दिवसांनी ब्रजेश सिंग जिवंत असल्याचे समोर आले आणि शत्रुत्वाची साखळी अखंड चालू राहिली. मुख्तारशी स्पर्धा करायची असेल तर ताकदीबरोबर मुत्सद्देगिरीही पाळावी लागेल, हे ब्रजेश सिंग याला आता समजले होते.

चक्क माणसाच्या छातीत धडधडले डुकराचे हृदय; अमेरिकेत जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

ब्रजेशने भाजपच्या कृष्णानंद राय यांना पाठिंबा दिला

मुख्तारला हरवण्याची संधी शोधत असलेल्या ब्रजेश सिंह याने निवडणूक प्रचारात भाजपच्या कृष्णानंद राय यांना पाठिंबा दिला. राय यांनी मुख्तार अन्सारी यांचा भाऊ आणि पाच वेळा आमदार अफजल अन्सारी यांचा 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत मोहम्मदाबाद मतदारसंघातून पराभव केला. मुख्तारने नंतर आरोप केला की, रायने यांनी ब्रजेश सिंगच्या टोळीला दिलेली सर्व कंत्राटे मिळवण्यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर केला होता आणि दोघांनीही त्याला मारण्याची योजना आखली होती.

ताकदीबरोबरच जातीय समीकरणांचा आधार

एकीकडे मऊ-गाझीपूर भागातील निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यासाठी अन्सारी मुस्लिम व्होटबँकेवर विसंबून राहिले, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधकांनी हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात गुन्हेगारी, राजकारण आणि धर्म या गोष्टींमुळे काही वेळा जातीय हिंसाचाराला चिथावणी दिली जात होती. अशाच एका दंगलीत मुख्तारला हिंसा भडकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.

…सर्वांना हादरवून सोडणारी घटना

यानंतर यूपीच्या राजकारणात अशी घटना घडली, ज्यामुळे सगळेच अवाक् झाले. मुख्तार तुरुंगात कैद होता आणि भाजपच्या कृष्णानंद राय यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. कृष्णानंद राय यांच्यासह 7 जणांचा मृत्यू झाला होता. 6 एके-47 रायफलमधून 400 गोळ्या झाडण्यात आल्या. मृतदेहाजवळ 67 गोळ्या सापडल्या. राजकीय वर्तुळात घबराट पसरली होती. पोलीस तपासात गुंतले. कृष्णानंद राय यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दोन हल्लेखोरांना शशिकांत राय या साक्षीदाराने ओळखले. हे दोघेही अन्सारी आणि बजरंगी शूटर्स गँगचे होते. मात्र, 2006 मध्ये साक्षीदार शशिकांत यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला.

कृष्णानंद राय यांच्या मृत्यूनंतर ब्रजेश सिंग गाझीपूर-मऊ भागातून पळून गेला. नंतर 2008 मध्ये त्याला ओडिशातून पकडण्यात आले. 2008 मध्ये अन्सारी याच्यावर खून प्रकरणातील साक्षीदार धर्मेंद्र सिंग यांच्यावर हल्ल्याचा आदेश दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पीडितेने प्रतिज्ञापत्र सादर करून अन्सारीविरुद्धची कारवाई थांबवण्याची विनंती केली. 2017 मध्ये अन्सारी हत्या प्रकरणातून निर्दोष सुटला होता.

कोल्हापूर : जिल्ह्याचा 640 कोटींचा प्रारूप आराखडा

मुख्तारने तुरुंगातून निवडणूक लढवली

मुख्तार आणि त्याचा भाऊ अफजल यांनी 2007 मध्ये बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. त्यावेळी मायावतींनी मुख्तार यांना ‘गरिबांचा मसिहा’ म्हटले होते. मुख्तारने 2009 ची लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढवली होती, तीही तुरुंगात असताना. मात्र मुख्तार यांचा भाजपच्या मुरली मनोहर जोशी यांच्याकडून पराभव झाला.

2009 मध्ये कपिल देव सिंह यांच्या हत्येप्रकरणी मुख्तार आणि इतर दोघांची नावे आरोपपत्रात होती. त्याने ऑगस्ट 2009 मध्येच ठेकेदार अजय प्रकाश सिंग याला ठार मारण्याचे आदेश दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. याशिवाय अन्सारीचे नाव रामसिंह मौर्य हत्या प्रकरणातही आले होते. 2009 मध्ये अन्सारी टोळीने कथितरित्या मारलेल्या मन्नत सिंगच्या हत्येप्रकरणी मौर्य हा साक्षीदार होता.

2010 मध्ये बसपने दोन्ही अन्सारी बंधूंची पक्षातून हकालपट्टी केली. गाझीपूरमध्ये मुख्तार तुरुंगात असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता, मुख्तार तुरुंगात चैनीचे जीवन जगत असल्याचे आढळून आले. त्याच्या कोठडीत एअर कुलर, स्वयंपाकाचे साहित्य सापडले. यानंतर त्यांची मथुरा तुरुंगात रवानगी करण्यात आली.

स्वतःचा पक्ष काढला

बसपमधून हकालपट्टी केल्यानंतर, तीन अन्सारी बंधूंनी (मुख्तार, अफझल आणि सिबकतिल्लाह) आपला स्वतःचा पक्ष क्वामी एकता दल स्थापन केला. यापूर्वी मुख्तारने हिंदू मुस्लिम एकता पक्षाची स्थापना केली होती, जी क्वामी एकता दलात विलीन झाली होती. 2012 मध्ये मुख्तारवर संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असल्याबद्दल ‘मोक्का’ लावण्यात आला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्तार याने वाराणसीमधून पीएम मोदींविरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

2016 मध्ये मुख्तारने 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा बसपामध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये क्वामी एकता दल बसपमध्ये विलीन झाला. मुख्तार अन्सारी याने मऊ विधानसभा मतदारसंघात बसपाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. अन्सारीने त्यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या महेंद्र राजभर यांचा पराभव केला होता. सध्या मुख्तार उत्तर प्रदेशातील तुरुंगात कैद आहे.

Back to top button