Lok Sabha Elections 2024
राष्ट्रीय
Lok Sabha election : लोकसभा निवडणूक सहाव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान
पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रक्रिया (Lok Sabha election) आज (दि.२५) पार पडत आहे. देशातील ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
देशातील ७ राज्यांमध्ये निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण १०.८२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये (Lok Sabha election)पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक १६.५४ टक्के तर ओडिसामध्ये सर्वात कमी ७.४३ टक्के मतदान झाले आहे. याशिवाय बिहार-९.६६ टक्के, हरियाणा-८.३१ टक्के, जम्मू-काश्मीर-८.८९ टक्के, झारखंड-११.७४ टक्के, दिल्ली-८.९४ टक्के, उत्तर प्रदेश १२.३३ टक्के मतदान झाले आहे.
Lok Sabha election: आकडे बोलतात
- ६व्या टप्प्यात ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
- ७९७ पुरुष आणि ९२ महिला उमेदवार आहेत. १,२४१ कोटी रुपयांच्या संपत्तीसह हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघाचे भाजप उमेदवार नवीन जिंदाल या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.
- ५४३ मतदारसंघांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत
- ४२९ जागांवर मतदान झाले आहे.
- २५ मेपर्यंत एकूण ४८७ जागांवर मतदान पूर्ण होईल. ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात ५६ जागांवर मतदान होईल.
- १८३ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
- ३९ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक ४८ उमेदवार.
हेही वाचा:

