

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यांतर्गत आज (२५ मे) ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील (जम्मू-काश्मीर) ५८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते; मात्र ते पुढे ढकलण्यात आल्याने सहाव्या टप्प्यात येथे मतदान होत आहे. मेहबुबा मुफ्ती येथे उमेदवार आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने या ५८ जागांपैकी सर्वाधिक ४० जागा जिंकल्या होत्या. बसपने ४, बिजदने ४, समाजवादी पक्षाने १, जदयुने ३, तृणमूलने ३, लोजपने १, एजेएसयूने १ जागा जिंकली होती. या मतदारसंघांत काँग्रेस आणि 'आप'ला खातेही उघडता आले नव्हते.