JEE Mains 2024 Syllabus | जेईई मेन अभ्यासक्रमात मोठा बदल, अनेक टॉपिक्स हटवले, वाचा संपूर्ण यादी

JEE Mains
JEE Mains
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन (JEE Mains 2024) चा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य २०२४ च्या अभ्यासक्रमासोबत टेस्टिंग एजन्सीने ऑनलाइन अर्जदेखील जारी केले आहेत. (JEE Mains 2024 Syllabus)

संबंधित बातम्या 

यावर्षी जेईई मेन २०२४ च्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. NTA ने ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT अभ्यासक्रमाशी संलग्न करण्यासाठी अभ्यासक्रमातून काही टॉपिक्स काढून टाकले आहेत.

रसायनशास्त्रातून 'हे' टॉपिक्स हटवले

रसायनशास्त्रातील बहुतांश टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत. भौतिक शास्त्रातील काही टॉपिक्स हटविण्यात आले आहेत. यात Communication Systems चा समावेश आहे. तसेच प्रायोगिक कौशल्यातून काही विषय काढून टाकण्यात आले आहेत.

रसायनशास्त्रातून स्टेटस ऑफ मॅटर (States of Matter), सरफेस केमिस्ट्री (Surface Chemistry), एस- ब्लॉक एलेमेंट्स (s-Block Elements), हायड्रोजन (Hydrogen), पर्यावरण रसायनशास्त्र (Environmental Chemistry), पॉलीमर्स (Polymers), केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ (Chemistry in Everyday Life), जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ मेटल्स (General Principles and Processes of Isolation of Metals), तसेच थॉमसन अॅंड रदरफोर्ड अॅटॉमिक मॉडल्स अॅंड देयर लिमिटेशन्स (Thomson and Rutherford's atomic models and their limitations) हे टॉपिक्स हटवण्यात आले आहेत. भौतिक प्रमाण आणि रसायनशास्त्रातील त्यांची मोजमापे आणि अचूकता, महत्त्वपूर्ण आकडे हा टॉपिकदेखील काढून टाकण्यात आला आहे.

गणितातून काही विषय हटवले

तर गणित विषयातून मॅथमेटिकल इंडक्शन्स (Mathematical Reasoning), मॅथमेटिकल रीजनिंग (Mathematical Inductions) हे टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत. थ्री डायमेंशनल ज्योमेट्री (Three Dimensional Geometry) मधून काही विषयही हटवण्यात आले आहेत.

परीक्षा कधी?

जेई मेन सेशन-१ एंट्रन्ससाठी अर्जाची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. JEE मेन सेशन-१ परीक्षा २४ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२४ रोजी तर सेशन-२ परीक्षा १ एप्रिल २०२४ आणि १५ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. परीक्षा शहरांची माहिती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दिली जाणार आहे. परीक्षेच्या तारखेच्या तीन दिवस आधी अॅडमिट कार्ड जारी केले जातील. (JEE Mains 2024 Syllabus)

ज्यांना जेईई मेन २०२४ साठी अर्ज करायचा आहे त्यांनी jeemain.ntaonline.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news