Farooq Abdullah : INDIA आघाडीला आणखी एक धक्का; फारूक अब्दुल्लांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय

Farooq Abdullah
Farooq Abdullah
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमधील निवडणुका स्वतंत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीचे सर्वात विश्वासू भागीदार होते. तसेच अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा देखील आघाडीचा महत्त्वाचा भाग होता. परंतु, अब्दुल्ला यांच्या निर्णयाने INDIA आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Farooq Abdullah)

नॅशनल कॉन्फरन्स एकट्यानेच लढेल, यात शंका नाही- फारूक अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरमधील निवडणुका आणि जागावाटपावर बोलताना शनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला म्हणाले की, "मला वाटते की दोन्ही राज्यांतील निवडणुका संसदीय निवडणुकांसोबतच होतील. जागावाटपाचा प्रश्न आहे, तर नॅशनल कॉन्फरन्स हा एकट्यानेच लढेल आणि यात शंका नाही, असे त्यांनी श्रीनगर येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Farooq Abdullah)

Farooq Abdullah : यापूर्वी 'या' पक्षांनी देखील जाहीर केली रणनिती 

यापूर्वी इंडिया आघाडीचा भाग असलेले आणि सध्या बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार यांनीदेखील आघाडीशी फारकत घेत, भाजपला साथ दिली. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा  ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. AAP आणि काँग्रेसने देखील आधीच जाहीर केले आहे की, ते पंजाबमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका एकट्याने लढतील. कारण त्यांचे राज्यातील स्थानिक नेते आघाडीच्या बाजूने नाहीत. 'आप'कडून जागावाटपाचा प्रस्ताव जाहीर करताना पाठक म्हणाले की, दिल्लीत लोकसभेच्या सातपैकी सहा जागा लढवण्याचा आणि एक काँग्रेसला देण्याची त्यांची योजना आहे. (Farooq Abdullah)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news