नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला

नाशिक : आंदेालनप्रसंगी प्रलंबित मागण्यांसाठी दाद मागताना सिटी लिंकचे वाहक. (छाया: हेमंत घोरपडे).
नाशिक : आंदेालनप्रसंगी प्रलंबित मागण्यांसाठी दाद मागताना सिटी लिंकचे वाहक. (छाया: हेमंत घोरपडे).
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

वाहकांच्या संपामुळे नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस सकाळपासून बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, वाहकांचे सर्व प्रश्न येत्या ७ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तुर्तास तरी संप मिटला आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. गुरुवार (दि.1) सकाळपासून तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. नाशिक महानगर परिवहन महामंडळ या कंपनीच्या माध्यमातून महापालिका शहर बस वाहतूक सेवा गेल्या वर्षी जुलैपासून सेवा देत आहे. सकाळच्या सत्रात दोनशे तर दुपारच्या सत्रात दोनशे अशा सुमारे चारशे बसेस खासगी ठेकेदारांमार्फत चालवल्या जातात. मात्र महापालिकेच्या कंपनीचे धोरण अत्यंत जाचक असल्याचा वाहकांचा आरोप करण्यात येत आहे. बसमध्ये प्रवास करताना तिकीट काढण्यास विलंब झाल्यास अथवा गर्दीमुळे तिकीट काढणे शक्य नसल्यास किंवा एखादा प्रवासी हा निर्धारित वेळी अथवा निर्धारीत ठिकाणी थांबण्यापेक्षा पुढील थांब्यावर उतरल्यास वाहन चालकांना जबाबदार धरून तीन ते पाच हजार रुपये दंड तसेच निलंबनाची कारवाई केली जाते. तिकीट चेकरचा वेगळा ठेका असल्याने ही कारवाई केली जाते. याप्रमाणे आतापर्यंत 65 वाहक निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात वाहक दाद मागत आहे. मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. या प्रकारामुळे गुरुवारी (दि.1) सकाळपासून नाशिकरोड आणि पंचवटी या दोन्ही आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. बुधवारी (दि.31) गणेशोत्सवाची सुटी तर गुरुवार (दि.1) कामकाजाचा दिवस असल्यामुळे सकाळी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच कर्मचारी कामगार वर्ग आणि अन्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. वाहकांचे कंत्राट असलेले ठेकेदार सचिन भोसले व सिटी लिंकचे उप महाव्यवस्थापक वाहतूक मिलिंद बंड यांनी वाहकांशी चर्चा करून तुर्तास तरी मार्ग काढून समस्याचे निरसन केले आहे.

वाहकांची आज दुपारी पुन्हा एक बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे व त्यांच्या ज्या मागण्या आहे. त्यातील ज्या मागण्या कायद्यात बसतील अशा मागण्या येत्या सात दिवसात सोडवण्यात येतील. – मिलिंद बंड, उप महाव्यवस्थापक, सिटी लिंक वाहतूक.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news