Nashik News : वाहन चालविण्यात तरुणी, महिलांचा वाढतोय टक्का

Nashik News : वाहन चालविण्यात तरुणी, महिलांचा वाढतोय टक्का
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) १ एप्रिल २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख ९१ हजार ०१८ चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना घेतला आहे. त्यापैकी २३.६९ टक्के म्हणजेच ४५ हजार २५७ महिलांनी परवाना काढला आहे. तर ३२ ट्रान्सझेंडर व्यक्तींनीही परवाना घेतला आहे. (Nashik News)

वाहन चालवण्यासाठी नागरिकांना परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी आरटीओकडे सुरुवातीस शिकाऊ परवाना काढावा लागतो. त्यानुसार एप्रिल २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २ लाख ३८२ जणांनी शिकाऊ परवाना घेतला होता. त्यात १ लाख ५८ हजार ४६२ पुरुष, ४१ हजार ६०२ महिला, ५३ ट्रान्सझेंडर असून २६५ चालकांचे लिंग समजू शकलेले नाही. तर याच कालावधीत १ लाख ४५ हजार ६५३ पुरुष, ४५ हजार २५७ महिला, ३२ ट्रान्सझेंडर व्यक्तींनी कायमस्वरुपी वाहन चालवण्याचा परवाना काढला आहे. तसेच ७६ जणांचे लिंग समजलेले नसून त्यांनीही कायमस्वरुपी परवाना घेतल्याचे आरटीओकडून स्पष्ट झाले आहे.

सिम्युलेटरचाही वापर

वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी चालकांना वाहन चालवण्याची परिक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओत असलेल्या मार्गावर वाहन चालवून चालकांची परिक्षा घेतली जाते. तसेच नव्याने सिम्युलेटर उभारण्यात आले असून त्यामार्फत १ हजार १५३ नागरिकांनी चाचणी दिली आहे.

विना परवानाधारकांवर कारवाई

परवाना नसताना वाहन चालवल्यास चालकांवर दंडात्मक कारवाई होत असते. तसेच वारंवार वाहतूक नियम मोडल्यास संबंधित चालकांचा वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यामुळे बेशिस्त चालकांवर वचक ठेवण्यास मदत होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news