Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर

जवानाला निरोप,www.pudhari.news
जवानाला निरोप,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झालेले उगाव (ता. निफाड) येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (वय ३२) यांना शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात मरळगोई येथे साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या जवानासाठी उगाव, मरळगोई तसेच लासलगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूने उगाव, मरळगोई व लासलगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहीद जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांचे पार्थिव लासलगाव शहरातील भगरीबाबा मंदिर येथे आणण्यात आले. फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेस सुरुवात होऊन लासलगाव शहराच्या मेनरोडमार्गे मरळगोई येथे दाखल झाली. या अंत्ययात्रेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह लासलगाव, उगाव, मरळगोई व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा मरळगोई येथे पोहोचल्यानंतर शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा पवन (वय 8) याने अग्निडाग दिला. यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ व कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांना भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली. 'भारत माता की जय….वीर जवान तुझे सलाम..'या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.

याप्रसंगी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी जि. प. सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, शिवा सुरासे, मरळगोईचे सरपंच निवृत्ती जगताप, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, उगावचे माजी उपसरपंच साहेबराव ढोमसे, शिवसेनेचे प्रकाश पाटील, वसंत पवार, शिवाजी सुपनर आदींनी शहीद जनार्दन यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उगावचे मधुकर ढोमसे, दत्ता ढोमसे, ज्ञानेश्वर ढोमसे (चुलते), बाबूराव ढोमसे (आजोबा), प्रभाकर मापारी, भास्करराव पानगव्हाणे, माधवराव चव्हाण, ॲड. रामनाथ शिंदे, शिवा ढोमसे, मनोज पानगव्हाणे, मधुकर गवळी, संजय वाबळे, दत्तात्रय सुडके, बाळासाहेब होळकर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news