Nashik Krushi Mahotsav : नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 

Nashik Krushi Mahotsav : नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये शनिवार (दि.१०) पासून कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Nashik Krushi Mahotsav)

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ८) आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी पत्रकार परिषद घेत महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. गंगापूर राेडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर १० ते १४ फेब्रुवारी या काळात महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद‌्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची निकम यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रातील वाढत्या ड्रोनवापराचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. सेंद्रिय शेतीसंदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिलांचे बचतगट यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टाॅलदेखील असतील. याव्यतिरिक्त खवय्यांना येथे महाराष्ट्रातील विविध भागांमधील खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. त्यामध्ये खानदेशातील भरीत, मांडे, कोकणातील कोंबडी वड्यापासून ते विविध पदार्थांचा यात समावेश असणार आहे. (Nashik Krushi Mahotsav)

महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग राबविणारे ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजिकांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच यंदाच्या वर्षापासून कृषिपूरक उद्योजक हा विभागातही पारितोषिक देण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी विभागाचे जगदीश पाटील व महिला आर्थिक विकास महांमडळाचे संजय गायकवाड उपस्थित होते.

महोत्सवात २५० स्टॉल

कृषी महोत्सवामध्ये सहा डोममध्ये तब्बल २५० स्टाॅल असणार आहे. त्यामध्ये सरकारी दालन, महिला बचतगट, कृषीनिविष्ठा व सिंचन विभाग, कृषी अवजारे, गृहपयोगी वस्तू तसेच खाऊगल्लीचा समावेश असेल. दरम्यान, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल, कृषी पर्यटन संधी व फायदे, खरेदीदार-विक्रेता संंमेलन, महिला परिसंवाद यासह विविध विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news