

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी ओमकार चारोस्करच्या मृत्यूनंतर संतप्त होत त्याच्या नातलगांसह मित्रांनी पीडितेच्या मातोरी येथील घरावर हल्ला केला. त्यात पीडितेचा भाऊ व इतर नातलगांना गंभीर दुखापत झाली. नाशिक तालुका पोलिस ठाण्यात या टोळक्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही कुटुंबीयांनी परस्परविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. (Nashik Crime)
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित ओमकार चारोस्कर याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. न्यायालयीन कोठडीत असताना ओमकारचा रविवारी (दि. २) मृत्यू झाल्याने त्याच्या नातलग व मित्रांनी मातोरी गावातील दुकानाची तोडफोड केली. तसेच पीडितेच्या घरावर हल्ला करून कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. यात पीडितेचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, पीडितेच्या आई-वडिलांनाही टोळक्याने मारहाण केली. त्यामुळे नाशिक तालुका पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात दुकानाची तोडफोड केल्या प्रकरणी व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी असे दाेन गुन्हे दाखल झाले आहेत. विनयभंगातील संशयित आरोपीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या घरच्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. (Nashik Crime)
हेही वाचा :