Nanded Accident : धनगर मोर्चातून परतणाऱ्या आंदोलकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार

Nanded Accident : धनगर मोर्चातून परतणाऱ्या आंदोलकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार
Published on
Updated on

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेड जवळ भिषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले तर तिघांची प्रकृर्ती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. रमेश दत्तराव वाघमारे (वय ५०) व लक्ष्मण पंडीत वाघमारे (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर चालक रंगनाथ संपतराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोड व बापुराव मारोती वाघमारे हे जखमी झाले आहेत.

माहूर तालुक्यातील वाई बाजार पासून जवळच ३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सरफराजपूर (ता. पालम जि. परभणी) येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी स्वीफ्ट डिझायर (एम.एच ०२ बी.पी. ९८३६) कारने नागपूर येथे गेले होते. तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेवून परतत होते. आज सकाळी साडेपाचच्या सुमारास अंजनखेड जवळील पुलावर आले असता अवजड वाहनाला ओव्हरटेक करताना पाठीमागून जोराची धडक दिली. (Dhangar Reservation)

या भिषण धडकेत डिझायरच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा झाला. यात रमेश वाघमारे आणि लक्ष्मण वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रंगनाथ वाघमारे, रामजी बनसोड व बापुराव वाघमारे यांना गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृर्ती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सिंदखेडचे पोलीस उपनिरिक्षक एस. पी. नागरगोजे, पो.हे.कॉ. दारासिंग चौहाण घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news