इंदापूरमधील प्रकरणानंतर पडळकर यांचे धनगर समाजाला आवाहन, म्हणाले…

इंदापूरमधील प्रकरणानंतर पडळकर यांचे धनगर समाजाला आवाहन, म्हणाले…
Published on
Updated on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. ९) इंदापूरमध्ये भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक केल्याची घटनेची चर्चा होती. या प्रकरणानंतर आज पडळर यांनी धनगर समाजाला एक आवाहन केले आहे. ते म्हणाले की,  इंदापूरचा ओबीसी मेळावा आटोपून शेतकऱ्यांच्या एका आंदोलनाला जात असताना काही समाजकंटकांनी माझ्याबाबत चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनगर समाजाने या घटनेचा निषेध करताना शांततेचा मार्ग निवडावा, हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा प्रकार घडला. पण काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (दि. १०) केले.

इंदापूर येथे झालेल्या घटनेबद्दल बोलताना आमदार पडळकर म्हणाले, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल मी संयम राखल्याने वेगळे काही घडले नाही. परंतु या घटनेनंतर या भेकडांनी परत नौटंकीबाजी करत मिडीयात मुलाखती दिल्या आणि ही सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली असा दावा करतात. याची खरोखर मला यांची कीव वाटते असे मत पडळकर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू असल्याचे पडळकर म्हणाले.

यावेळी पडळकर यांनी ओबीसी बांधवांना कोणताही हिंसेचा मार्ग न स्विकारण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. आपल्याला डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे.  त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. या मोर्चासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news