नाशिकमध्ये पुन्हा खून,www.pudhari.news
नाशिकमध्ये पुन्हा खून,www.pudhari.news

नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरुच, मखमलाबाद रोड परिसरात आढळला मृतदेह

Published on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात एका पाठोपाठ एक खुनाचे सत्र सुरू असून सकाळी पुन्हा समर्थ नगर समोरील हमालवाडी पाटालगत अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृताचा चेहरा ठेचलेला असल्याने तुर्त मृतदेहाची ओळख पटलेली नाही. सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या सह पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या गंगापूर कॅनाल डावा तट कालव्यात पाणी नसलेल्या (कोरड्या) पाटात पहाटे ४० वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर मयताच्या डोक्यावर लागून तो अपघात होऊन पाटात पडून मृत्यू झाला असावा. असा बनवा रचण्यात आला होता. नंतर भावानेच शेतीच्या वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

घटनास्थळावर मारेक-याचा माग काढताना श्वान पथकातील गुगल समवेत श्वान प्रशिक्षक गणेश कोंडे
घटनास्थळावर मारेक-याचा माग काढताना श्वान पथकातील गुगल समवेत श्वान प्रशिक्षक गणेश कोंडे

सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून स्थानिक नागरिकांना ओळख पटविण्यासाठी बोलाविण्यात आले मात्र, ओळख पटलेली नाही. दरम्यान घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे श्वानपथकातील गुगल या श्वानाने मारेक-याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वानाने दाखवलेल्या दिशेमुळे मारेक-याबद्दल महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचे समजते.  पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news