नगर : दिव्यांगास हिणविले; 5 जणांवर गुन्हा दाखल

नगर : दिव्यांगास हिणविले; 5 जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील आपेगाव येथे एका 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीस हिनवून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पोपट खिलारी (वय 35 , धंदा. पिठाची गिरणी रा. आपेगाव) हे आई रतनबाई पोपट खिलारी व आजोबा ज्ञानदेव यशंवत खिलारी यांच्यासमवेत ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत राहावयास आहे.

11 जानेवारी रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शेजारी रोडच्या कडेला राहणारे साहेबराव बारकु खिलारी हे त्यांचे सरपण उचलण्यास आले असता त्यांना माझे आजोबा 'आमच्या उकिरड्यावर सरपण टाकू नको', असे म्हणाले. त्याचा राग येऊन त्यांना दमदाटी करू लागला. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, 'तुम्ही त्यांना बोलू नका, असे म्हणालो. तेव्हा तेथे रावसाहेब बारकू खिलारी हा तेथे आला व त्याने मला दृष्टीहीन म्हणून हिनविले. आमचा आवाज ऐकून त्या ठिकाणी समाधान रावसाहेब खिलारी, अमोल रावसाहेब खिलारी, मिराबाई साहेबराव खिलारी हे आले. रावसाहेब खिलारी याने आमचा उकीरडा पांगवला व आजोबास हात धरुन खाली पाडले. मी सोडविण्यास गेलो असता मला मारहाण केली.

या सर्व घटनेनंतर शरद पोपट खिलारी यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाणे गाठून रावसाहेब बारकू खिलारी यांच्या विरोधात दृष्टिहीन म्हणून हिणवले असल्याची फिर्याद दिली. सदर फिर्यादी वरून याप्रकरणी अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम अन्वये साहेबराव बारकु खिलारी, रावसाहेब बारकु खिलारी, समाधान रावसाहेब खिलारी, अमोल रावसाहेब खिलारी, मिराबाई साहेबराव खिलारी या पाच जणांविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात या प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई सुरेश आव्हाड करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news