पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक युवक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले. त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या घटनेची माहीती देण्यात आली.