

पुढारी ऑनलाईन डेस्क : विद्या बालनच्या 'नीयत'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Neeyat Trailer) हा एक मर्डर मिस्ट्री असून पुढील आठवड्यात चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये राहुल बोस, नीरज काबी, निक्की वालिया, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, शशांक अरोरा ते दिनेश रिजवी यासारखे स्टार्सदेखील दिसणार आहेत. (Neeyat Trailer)
विद्या बालनचा अपकमिंग चित्रपट 'नीयत'चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये विद्या बालन यंदा काय खास भूमिका दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 'नीयत'चे दिग्दर्शक अनु मेनन आहेत. ही एक मर्डर-मिस्ट्री असून, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलरची सुरुवात सुंदर नजर आणि राम कपूरच्या मोठ्या स्माईलसोबत होते. सर्वजण मिळून पार्टी करतात. परंतु, कहाणी तेव्हा पालटते जेव्हा मिस्टर कपूरचा मर्डर होतो. या मिस्ट्रीला सोडवण्य़ासाठी एंट्री होते मीरा राव सीबीआयची.
'नीयत' ७ जुलै २०२३ रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये राहुल बोस, नीरज काबी, निक्की वालिया, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, दिनेश रिजवी हेदेखील कलाकार असतील.