

पालघर; पुढारी वृत्तसेवा : मनोर लगतच्या वैतरणा खाडी पात्रात आलेल्या दोनशे किलो वजनी शार्क माशाने मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला गंभीर जखमी केले आहे. यामध्ये जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे दोनशे किलो वजन असलेला शार्क मासा पकडण्यात मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांना यश आले आहे. (Mumbai News)
वैतरणा खाडी पात्रात ओहोटीच्या वेळी पाण्याचा स्तर कमी झाल्याने शार्क माशा मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांना दिसला. शार्क माशाने खाडी पात्राच्या पलीकडे लाकडे आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा घेत पायाचा लचका तोडला आहे. जखमी तरुणाला गायकवाड डोंगरी वरील ग्रामस्थांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या शार्क माशाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
हेही वाचा :