

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या पत्नी वसुधा रोहतगी यांनी दिल्लीतील 'गोल्फ लिंक्स' परिसरात २ हजार १६० स्क्वेअर यार्डचा बंगला १६० कोटी रुपयांना विकत घेतला आहे.
विक्री करारानुसार, बंगल्याचा प्लॉट एरिया १८०६.३५ चौरस मीटर असून संपूर्ण इमारतीचे क्षेत्र १८६९.७ चौरस मीटर आहे. या मालमत्तेची नोंदणी २४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. रोहतगी कुटुंबाने या खरेदीसाठी ६.४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. गोल्फ लिंक्स हा दिल्लीतील सर्वात महागड्या आणि पॉश परिसरापैकी एक मानला जोतो. राजधानीत राहणाऱ्या श्रीमंतांची पहिली पसंती या परिसराला असते. गेल्या वर्षी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांनी लुटियन्स या दिल्लीतील सुंदर परिसरात ८६६ चौरस यार्डचा बंगला ८५ कोटी रुपयांना विकत घेतला होता.
हेही वाचा :