DSP Video : अर्धनग्‍न अवस्थेत ‘डीएसपी’ची शेजाऱ्याला बेदम मारहाण ( व्‍हिडीओ व्‍हायरल )

DSP Video : अर्धनग्‍न अवस्थेत ‘डीएसपी’ची शेजाऱ्याला बेदम मारहाण ( व्‍हिडीओ व्‍हायरल )
Published on
Updated on

इंदौर ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये डीएसपी वेदांत शर्मा यांच्या घरा शेजारी बांधकाम सुरू आहे. दरम्यान त्या शेजाऱ्याला डीसपींच्या घरासमोर घर बांधणे महागात पडले. घराचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडत होती. यामुळे डीएसपींच्या वाहनांवर मोठी धुळ बसली होती. याचा जाब त्या शेजाऱ्याला ते विचारण्यासाठी अर्धनग्ण अवस्थेत बाहेर गेले. थेट शेजाऱ्याला लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ जोरदार (DSP Video) व्हायरल होत आहे. शेजारच्या घरमालकाने आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. दरम्यान डीएसपी अर्धनग्न अवस्थेत आपल्या घरात जात काठी घेऊन येत शेजारच्या घरमालकाच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना बाजूच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

DSP Video :  'डीएसपी'कडून शिवीगाळ आणि मारहाण

ही घटना इंदाैर येथील लक्ष्य विहार कॉलनीतील आहे. संदीप विज हे बँक कर्मचारी आहेत. ते डीएसपींच्या बंगल्याशेजारी इंदौरमध्ये आपल्‍या घराचे बांधकाम करत आहेत. शर्मा सध्या उज्जैनमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. बांधकामामुळे त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रचंड धूळ पडत होती. यावर डीएसपींनी संदीप यांना जाब विचारत थेट शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

संदीप हे वेदांत शर्मा यांच्याशी बोलत असताना डीएसपी अचानक चिडले. त्यांनी संदीप यांना थेट शिवीगाळ करत मारहाण करत रस्त्यावर आणले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डीएसपी अर्धनग्ण अवस्थेतच मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी संदीप यांनीही प्रतिकार करण्‍याचा प्रयत्‍न केला.

संदीप हे आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना तर डीएसपी काठी घेऊन त्‍यांच्‍या मागे धावतानाचा व्हिडीओत दिसत आहेत. डीएसपी वेदांत शर्मा यांच्या तक्रारीनंतर कानडीया पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश जमरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप विज यांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

डीएसपींनी अनेक वेळा केली हाेती विनंती

संदीप विज यांच्या घरात ६ महिन्यांपासून काम सुरू आहे, त्यांच्या घराजवळ बांधकामाचे मटेरियल टाकले जात असल्याचे डीएसपी यांनी तक्रार म्‍हटलं आहे. शर्मा यांनी अनेकवेळा संदीप यांना आपल्या वाहनावरील धूळ पडत असल्‍याचे सांगितले होते. मात्र त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍याचे तक्रारीत शर्मा यांनी नमूद केले आहे.

 हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news