

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) अनेकदा तिच्या हॉट अभिनय आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकते. पुन्हा एकदा मौनी रॉयने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चढवला आहे. या फोटोशूटमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. खास बाब म्हणजे तिने ट्रान्सपरंट श्रग असलेली ब्रा आणि पोपटी रंगाची शॉर्ट परिधान केलीय. तिचा किलर लूक सर्वांनाच घायाळ करणारा आहे. (Mouni Roy )
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा प्रत्येक फोटो पाहून तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. पुन्हा एकदा मौनीने आकर्षक कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ दिलीय. तिचे चाहते मौनीच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत.
अलीकडेच मौनी रॉयने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तिने क्रिम कलरची ब्रा श्रग घातलीय. आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे.
मौनी रॉयचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. पूल साईटवर अभिनेत्री एकापेक्षा एक सेक्सी पोज देत आहे. तुम्हीही मौनीच्या सौंदर्यात हरवून जाल. मौनी रॉयने गोल्डन ब्रेसलेट आणि डायमंड स्टडसह तिचा लूक पूर्ण केलाय. हातात हेवी ब्रेसलेट घालत तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. उडत्या केसांमध्ये तिने हा फोटोशूट केला आहे. कमी मेकअपमध्येही मौनी खूप सुंदर दिसते.
मौनी रॉयने छोट्या पडद्यावरील अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. यामध्ये 'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' सारख्या मालिकांची नावे आहेत. याशिवाय तिने २०१८ मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने अनेक आयटम सॉन्गदेखील केले आहेत.
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर, २०२२ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.