

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
कोलंबो; वृत्तसंस्था : कर्जबाजारी पाकिस्तानकडून गाढव खरेदीनंतर चीन आता श्रीलंकेकडून टूक मकाक प्रजातीची एक लाख माकडे विकत घेणार आहे. चिनी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेने त्यासाठी तयारी दर्शविली आहे. चीनमधील विविध 1 हजार प्राणी संग्रहालयांकरिता ही माकडे चीनला हवी आहेत. या व्यवहारासाठी श्रीलंकेत एक समितीही स्थापन झाली आहे. (Monkey Business)
श्रीलंकेत माकडे उदंड झालेली आहेत. माकडांमुळे श्रीलंकेत होणारे पिकांचे (विशेषत: नारळ पीक) नुकसान 157 कोटींच्या घरात आहे.
श्रीलंकेने नुकतेच माकडांना संरक्षित प्राण्यांच्या यादीबाहेर काढले आहे. शेतकर्यांना माकडांना ठार मारण्याची मुभाही मिळाली आहे.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
प्राणीप्रेमींचे हे आक्षेप…
चीनचा माकड खरेदीचा उद्देश तपासावा. चिनी खरोखर ही माकडे प्राणीसंग्रहालयात ठेवणार आहेत, माकडांवर संशोधन करणार आहेत, की त्यांच्या मांसावर ताव मारणार आहेत?
– जगत गुणवर्धने,
पर्यावरणप्रेमी, श्रीलंका
अधिक वाचा :